शरद पवारांचे संतोष देशमुख हत्याप्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; केली मोठी मागणी

राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 6 Jan 2025
  • 12:02 pm
Sharad Pawar wrote a letter to Chief MinisteBeed,Walmik Karad,Sushma Andhare,Prajakta Mali,Sushma Andhare On Prajakta Mali,Devendra Fadnavis On Santosh Deshmukh Murder Case,Devendra  Fadnavis,Santosh Deshmukh Murder Case,Santosh Deshmukh,MAHARASHTRA GOVERMENT,Dhananjay Munde,Pankaja  munde,वाल्मिक कराड, संतोश देशमुख हत्या प्रकरण, बीड, संतोष देशमुख, देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र सरकार, पोलीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, वाल्मिक कराड, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, अंजली दमानिया, सुषमा अंधारे, प्राजक्ता माळी

devendra fadnavis

गेल्या काही दिवसांपासून राज्याभरात संतोष हत्याप्रकरणावर संताप व्यक्त केला जात आहे. राज्यातले वातावरण चांगलेच तापलेलं आहे. अशातच राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी लोकप्रतिनीधींना पोलिस संरक्षण पुरवावे अशी मागणी केली आहे. 

 

 

 

शरद पवारांनी पत्रात नेमकं म्हटलं तरी काय?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली. या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे. त्यामुळे, या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे निदर्शनास येते. 

 

बीड- परळी भागात यापूर्वी देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळेमूळे खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे व त्यासाठी ते सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत आहेत. 

 

असे असताना याच गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Share this story

Latest