Taj hotel
मुंबईच्या ताज हॉटेल बाहेर एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्या आढल्याने चांगलीच खळबळ उडाली. अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. दोन्ही वाहनं संशयास्पद आढळल्याने मुंबई पोलिसांनी याचा तपास केला. यावेळी गांभीर्य लक्षात घेऊन तपास केला असता भलतचं कारण समोर आलं. ज्यामुळं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 10.30 च्या सुमारास ताज हॉटेलच्या बाहेरील परिसरामध्ये एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्या आढळून आल्या. या प्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळ गाडीचे मालक असलेले शागीर अली यांनी ताज हॉटेलच्या परिसरात आपल्याच गाडीचा नंबर असलेली गाडी पकडली.
शागीर आली यांनी गेल्या सहा महिन्यांपूर्वीच डुबलीकेट नंबर प्लेटच्या संदर्भात आरटीओ कडे तक्रार दाखल केली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना खोटे चालान त्यांना भरावे लागत होते. या सगळ्या आर्थिक भुर्दंडाच्या संदर्भात त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. परंतु आज डुबलीकेट नंबर प्लेट असलेले गाडी त्यांना सापडली आणि त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली.
एकच नंबर प्लेट असलेल्या दोन गाड्या मागचं गौडबंगाल काय?
तक्रार दाखल झाल्यानंतर बनावट नंबर प्लेट वापरणाऱ्या चालकाने पोलिसांना विचित्र कारण सांगितले. कर्ज फेडण्यास सक्षम नाही, म्हणून त्याने त्याच्या वाहनाचा शेवटचा क्रमांक 3 होता तो 8 केला. यातील मूळ वाहन क्रमांक MH01EE2388 या प्रकरणातील संशयित आरोपी चालकाचा कार क्रमांक MH01EE2383 असा असल्याने त्याने शेवटी 3 चे 8 मध्ये रूपांतर केले होते.