संग्रहित छायाचित्र
आज उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्याचा २०२४ -२५ वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. २०२४ -२५ या वर्षासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात केल्या आहे. तसेच अनेक उपक्रमांसाठीही तरतूद करण्यात आली आहे. (Maharashtra Budger 2024)
आजच्या अर्थसंकल्पात वित्तमंत्री अजित पवार यांनी एक घोषणा केली असून या घोषणेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अयोध्या आणि श्रीनगर येथे महाराष्ट्र भवन बांधण्याची घोषणा पवारांनी अर्थसंकल्पात केली आहे. राज्यातील पर्यटकांना व भाविकांना किफायतशीर दरामध्ये उत्तम सुरक्षित सेवा पुरवण्यासाठी जम्मू काश्मीर मधील श्रीनगर येथे आणि उत्तर प्रदेशातील अयोध्येत महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे असं त्यांनी सांगितलं. (Ajit Pawar)
या दोन्ही ठिकाणी मोक्याच्या जागेवर ही महाराष्ट्र सदने बांधली जाणार असून या जागांसाठी ७७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.