कंटेनर, पिकअप आणि ओमनीचा विचित्र अपघात

मुंबई-नाशिक महामार्गावरील अपघातांच्या घटनांचे प्रमाण वाढत असून गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कसारा घाटातील हॉटेल ऑरेंज परिसरात कंटेनर, पिकअप आणि ओमनी या तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात होऊन दोन जैन साध्वींचा मृत्यू झाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 9 Jun 2023
  • 08:27 am

कंटेनर, पिकअप आणि ओमनीचा विचित्र अपघात

#मुंबई

मुंबई-नाशिक महामार्गावरील अपघातांच्या घटनांचे प्रमाण वाढत असून गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कसारा घाटातील हॉटेल ऑरेंज परिसरात कंटेनर, पिकअप आणि ओमनी या तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात होऊन दोन जैन साध्वींचा मृत्यू झाला आहे.

मुंबई-नाशिक मार्गावर अपघात वाढत असल्याचे चित्र आहे. सध्या सुट्ट्यांचा काळ असल्याने अनेक पर्यटक नाशिक, मुंबई प्रवास करत आहेत. त्यातच भरधाव  जाणाऱ्या, ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. याचाच प्रत्यय गुरुवारी पहाटे पुन्हा एकदा आला. एका कंटेनरने पिकअपला आणि ओमनी कारला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात पायी चालणाऱ्या दोनही जैन साध्वींना धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नाशिक येथील पवननगर परिसरात चातुर्मास कार्यक्रमासाठी जात असताना काळाने घाला घातला आहे. या घटनेने जैन बांधवांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सिद्धाकाजी आणि हर्षाईकाजी अशी या दोन साध्वींची नावे आहेत. नाशिक शहरातील पवननगर परिसरात चातुर्मासाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी साध्वी नाशिकला पहाटेच्या सुमारास निघालेल्या होत्या. पायी प्रवास करत असताना अचानक कंटेनरने समोरील पिकअप आणि ओमनीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, पिकअप आणि ओमनी वाहनाचा चक्काचूर झाला. याचवेळी पायी जात असलेल्या दोन जैन साध्वींना वाहनाने धडक दिली. यात दोन्ही जैन साध्वींचा मृत्यू झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. तसेच या अपघाताचा पंचनामा करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

कसारा घाट अपघाताचे केंद्र

नाशिक-मुंबई महामार्ग अपघाताचे केंद्र बनत असून रोजच अनेक अपघातांना सामोरे जावे लागत आहे. यात मृत्यूचे प्रमाण अधिक असून अनेकदा वेगाने वाहन चालवल्याने, ओव्हरटेक करताना अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अपघात झाल्यानंतर स्थानिक कसारा पोलीस आणि महामार्ग पोलीस आणि रुट पेट्रोलिंग टीम घटनास्थळी होऊन पुढील कार्यवाही करते. मात्र नेहमीच्या अपघातामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी कठीण होऊन बसला आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest