'मटण खाणाऱ्या ब्राह्मणाचा शाप नाही लागत'; फडणवीसांवर टीका करताना नाना पटोले यांची घसरली जीभ, काय बोलले?

देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) जोरदार तयारी सुरू आहे. सभा, प्रचार, दौरे यांना वेग आला आहे. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या सभा जोरदार सुरू आहेत.

Nana Patole

संग्रहित छायाचित्र

#मुंबई : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) जोरदार तयारी सुरू आहे. सभा, प्रचार, दौरे यांना वेग आला आहे. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या सभा जोरदार सुरू आहेत. दरम्यान अकलूज येथे जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘मी कुणाच्या नादी लागत नाही, कुणाचे वाईट चिंतत नाही, परंतु माझ्यासोबत विश्वासघात केला की, त्यांचा सत्यानाश होतो, माझा इतिहास तपासा’, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्याचबरोबर शरद पवारांवरदेखील हल्लाबोल केला होता. त्यावरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी टीका केली आहे, त्यावेळी पटोलेंची जीभ घसरली.

'देवेंद्र फडणवीसांना हे बोलण्याचा अधिकार नाही. ते ब्राम्हण आहेत म्हणून त्यांचा शाप आता लागत नाही. ते ओरिजनल ब्राम्हण नाहीत ते मटण खाणारे ब्राम्हण आहेत. मटण खाणाऱ्या ब्राम्हणाचा शाप लागत नसतो.  तुम्ही २०१४ मध्ये सत्तेत येण्यासाठी जे काही बोलला होतात, धनगरांना न्याय देऊ, मराठ्यांना न्याय देऊ, विविध जातींना न्याय देऊ, कुठे केले ते सांगा. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना हे बोलण्याचा अधिकार नाही आणि शाप देण्याचा अधिकार नाही. त्यांनी महाराष्ट्राचा सत्यानाश केला आहे. शाहू,  फुले, आंबेडकर यांच्या विचाराला ज्यांनी काळीमा लावण्याचे पाप केले,  त्या फडणवीसांना बोलण्याचा अधिकार नाही पण, ते बोलत आहेत तर बोलू देत, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest