बारामती बँकेतून ५०० रुपयांच्या नोटा गायब !

बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Loksabha Election) होत असलेल्या लढतीकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूकडून एकमेकांवर प्रचंड आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

Baramati Loksabha Election

बारामती बँकेतून ५०० रुपयांच्या नोटा गायब !

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोटा गायब केल्याचा रोहित पवारांचा संशय, जिल्हाधिकाऱ्यांचे सत्यता पडताळणीचे आदेश

बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Loksabha Election) होत असलेल्या लढतीकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूकडून एकमेकांवर प्रचंड आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच मतदानाबी तारीख जवळ येत असतांना बारामती सहकारी बँकेतून ५०० रुपयांच्या नोटा गायब झाल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) एक द्विट केलं आहे.

रोहित पवारांनी केलेल्या दाव्यानुसार बारामती सहकारी बँकेतून ५०० रुपयांच्या नोटा नायब झाल्याची माहिती मिळते, त्या नोटा खातेदारांना मिळत नाहीत, आता या नोटा कुठं गेल्या, याचे रहस्य काही उलगडत नाही. हा निव्वळ योगायोग आहे की पाच दिवसांवर निवडणूक आल्याने धनशक्तीच्या सहयोगाने होणाऱ्या हाऊसफुल्ल शोचा परिणाम आहे, हे बारामतीकरच ठरवतील असे म्हणत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबाबतही असेच होत आहे का बघावे , असेही रोहित पवारांनी म्हटलंय. लागेल दरम्यान, या आधीदेखील रोहित पवारांनी एक व्हीडीओ द्विट करत अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. अजित पवार यांच्या सभेला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पैसे दिल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता, तसेच वीडीओत असलेल्या महिलांनीदेखील दिलेले पैसे बाहेर काढून दाखवले होते.

बारामती सह‌कारी बँकेतून ५०० रुपयांच्या नोटा गायब झाल्या असून त्या खातेदारांना मिळत नाहीत. आता या नोटा कुठं गेल्या याचं रहस्य काही उलगडत नाही हा निव्वळ योगायोग आहे की पाच दिवसांवर निवडणूक आल्याने धनशक्तीच्या सहयोगाने होणाऱ्या 'हाऊसफुल्ल' शोचा परिणाम आहे, हे बारामतीकरच ठरवतील। या आरोपांबाबत पुण्याचे जिलाधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिक्से यांनी सांगितले की, "आमच्याकडे प्रत्येक बैंकच्या व्यवहारावर मोठ्या प्रमाणात पैसे काढणे आणि

ठेवींवर लक्ष ठेवण्यासाठी एक विशेष टीम आहे. जवळपास २४०० बैंक शाखा आमच्या टीमच्या स्कैनरखाली आहेत. या टीममध्ये केंद्रीय आणि राज्य वस्तू आणि सेवा कर, आयकर, रेल्वे आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest