HSC Result 2024: बारावीचा निकाल जाहीर; पुणे जिल्ह्याची यंदा आघाडी

राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत पुणे विभागाचा निकाल ९४.४४ टक्के लागला. त्यात पुणे जिल्ह्याने ९५.२६ टक्क्यांसह विभागात आघाडी घेतली.

संग्रहित छायाचित्र

पुणे विभागात जिल्ह्याचा सर्वाधिक ९५.२६ टक्के निकाल

राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत पुणे विभागाचा निकाल ९४.४४ टक्के लागला. त्यात पुणे जिल्ह्याने ९५.२६ टक्क्यांसह विभागात आघाडी घेतली.

पुणे विभागीय मंडळाच्या अध्यक्ष मंजूषा मिसकर आणि सचिव औदुंबर उकिरडे यांनी मंगळवारी (दि. २१) निकाल जाहीर केला. पुणे विभागात पुणे, अहमदनगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो.  पुणे जिल्ह्यातून एकूण १ लाख ३८ हजार ९४९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या १ लाख ३८ हजार १५२ विद्यार्थ्यांपैकी १ लाख २८ हजार ७६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

पुणे विभागातील २ लाख ६० हजार ३८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या २ लाख ५८ हजार ६०८ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ४० हजार ३५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या १६ हजार पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी १५ हजार ७९४ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली, तर ११ हजार २१ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ६९.७७ आहे, तर नियमित आणि पुनर्परीक्षार्थी मिळून ९२.९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

अहमदनगर जिल्ह्यातून नोंदणी केलेल्या ६४ हजार ३९२ विद्यार्थ्यांपैकी ६३ हजार ८५७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील ५८ हजार ९६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांची टक्केवारी ९२.३३ टक्के आहे. सोलापूर जिल्ह्यातील ५७ हजार ४६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या ५६ हजार ५९९ विद्यार्थ्यांपैकी ५२ हजार ६२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांची टक्केवारी ९२.९७ आहे.

पुणे जिल्ह्यातून विज्ञान शाखेतील ७८.५४ टक्के, कला शाखेतील ६७.०५ टक्के, वाणिज्य शाखेतील ६६.५३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अहमदनगर जिल्ह्यातील विज्ञान शाखेचे ६८.१६ टक्के, कला शाखेचे ५१.५१ टक्के, वाणिज्य शाखेचे ४७.०१ टक्के, तर सोलापूर जिल्ह्यातील विज्ञान शाखेचे ७४.७७ टक्के, कला शाखेचे ७८.३६ टक्के, वाणिज्य शाखेचे ७७.५५ टक्के उत्तीर्ण झाल्याची माहिती पुणे विभागीय मंडळाने दिली. (HSC Result 2024)

कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला आहे. सर्वाधिक ९७.५१ टक्के निकाल कोकण विभागाचा, तर मुंबई विभागाचा सर्वांत कमी ९१.९५ टक्के निकाल लागला. यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आली. यंदा राज्यातील १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक सात लाख ६० हजार ४६ विद्यार्थी, कला शाखेसाठी तीन लाख ८१ हजार ९८२, वाणिज्य शाखेसाठी तीन लाख २९ हजार ९०५, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ३७ हजार २२६, आयटीआयसाठी चार हजार ७५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यातील ३ हजार ३२० केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. यंदाच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. ९२.६० टक्के मुलगे, तर ९५.४९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यंदा निकाल वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील विद्यार्थिनीला शंभर टक्के गुण

छत्रपती संभाजीनगर विभागातील एका विद्यार्थिनीला १०० टक्के गुण मिळाले आहेत. १०० टक्के गुण मिळवलेली ही राज्यातील एकमेव विद्यार्थिनी आहे. या विद्यार्थिनीला प्रत्यक्ष परीक्षेत ५८२ आणि क्रीडा गुण १८ असे एकूण ६०० पैकी ६०० गुण मिळाले आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. गोसावी म्हणाले की, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनीने १०० टक्के गुण मिळवणे कौतुकास्पद आहे. खेळात केलेली मेहनत आणि अभ्यासातील सातत्य याचा परिणाम तिच्या निकालात दिसत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest