संग्रहित छायाचित्र
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल २९.८६ टक्के लागला आहे. तर पुणे विभागाचा २२.२२ टक्के निकाला लागला आहे. मात्र, यावेळी निकालात ५१.४७ टक्क्यांसह लातूर विभागाने बाजी मारली आहे. तर मुंहबई विभाग १५.७५ टक्क्यांसह शेवटच्या स्थानावर आहे.
महाराष्ट्र शिक्षण मंडळाने परिपत्रकाद्वारे दहावीचा निकाल आणि विभागवार टक्केवारी जाहीर केली. यामध्ये अमरावती विभागाचा ४३.३७ टक्के, नागपूर ४१.९० टक्के, नाशिक ४१.९० टक्के, औरंगाबाद ३७.२५ टक्के आणि कोल्हापूर २९.१८ टक्के निकाल लागला आहे.
दहावीच्या निकालात लातूर विभागाने बाजी मारली आहे. तर त्याखालोखाल अमरावती, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे आणि मुंबई विभागाने कामगिरी केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा १८ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत पार पडली. यंदा दहावीच्या परीक्षेला ४९ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.