ssc result 2023 : उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार !

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेचा निकाल उद्या (शुक्रवार) जाहीर होणार आहे. उद्या दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 1 Jun 2023
  • 01:46 pm
ssc result 2023 : उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार !

संग्रहित छायाचित्र

दुपारी एक वाजता पाहता येणार विद्यार्थ्यांना निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेचा निकाल उद्या (शुक्रवार) जाहीर होणार आहे. उद्या दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च - एप्रिल २०२३ मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. दहावीच्या मार्च - एप्रिल २०२३ परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहेत.

कुठे पाहाल निकाल?

पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल -

www.mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://ssc.mahresults.org.in

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest