दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी : २७ मे रोजी दहावीचा निकाल !

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली आहे. येत्या २७ मे रोजी दहावीचा निकाल लागणार आहे, अशी माहिती शिक्षण बोर्डाने दिली आहे.

10th result

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी : २७ मे रोजी दहावीचा निकाल !

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली आहे. येत्या २७ मे रोजी दहावीचा निकाल लागणार आहे, अशी माहिती शिक्षण बोर्डाने दिली आहे. (10th result)

दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येईल, असंही बोर्डाने स्पष्ट केलं आहे. नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला होता. यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांसह पालकांना होती.

सोमवारी दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळासह ६ ठिकाणी निकाल पाहता येईल. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२४ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती.

दहाविच्या विद्यार्थ्यांना त्यांचे विषयनिहाय गुण ऑनलाइन निकालात पाहता येतील. तसंच निकालीची छापील प्रतही विद्यार्थ्यांना मिळू शकेल. https://mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर माहिती सविस्तर उपलब्ध होईल. शाळा आणि संस्थांसाठी https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर एकत्रित निकाल पाहता येणार आहे.

ऑनलाईन निकालानंतर जर विद्यार्थ्याला स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन करायचे असेल तर संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करता येईल.

कुठे बघायचा निकाल?

१. https://mahresult.nic.in

२. http://sscresult.mkcl.org

३. https://sscresult.mahahsscboard.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest