संग्रहित छायाचित्र
१ ते २६ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही परीक्षा घेण्यात येणार आहे. १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परीक्षा सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी राज्य मंडळाने २७१ भरारी पथके नेमली आहे. राज्य मंडळाचे भरारी पथकांसोबतच जिल्हा स्तरावरही भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहे. (tenth exam news)
परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी राज्य मंडळ स्तरावर दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहायक परीरक्षक यांचे बैठे पथक उत्तरपत्रिकेची गोपनीयता राखण्यासाठी परीक्षा केंद्रावर कार्यरत राहतील. प्रश्नपत्रिकांची गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून ते प्रश्नपत्रिका वितरित करेपर्यंतचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. सहायक परीरक्षक आपल्या मोबाइलचे जीपीएस सुरू ठेवतील.
लोकसभा निवडणूकीचा परीक्षेच्या निकालावर कोणतेही परिणाम होणार नाही. परीक्षेचे निकाल वेळेवर लागतील असे राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.