Nigdi Crime : टोळक्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

पिंपरी चिंचवडमधील निगडी परिसरातील ओटास्कीम येथे ५ ते ६ जणांच्या टोळक्याने दोघांवर हल्ला केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 12 Oct 2023
  • 12:51 pm
Nigdi Crime : टोळक्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

टोळक्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

पिंपरी चिंचवडमधील निगडी परिसरातील ओटास्कीम येथे ५ ते ६ जणांच्या टोळक्याने दोघांवर हल्ला केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (११ ऑक्टोबर) रात्री घडली.

आकाश दूनधव (वय २२, रा. ओटास्कीम, निगडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा साथीदार गंभीर जखमी आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी रात्री ओटास्कीम येथे पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दोन तरुणांवर खुनी हल्ला केला. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला केल्यानंतर सर्व आरोपी पळून गेले. आरोपींच्या मागावर पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. मृत आकाश आणि आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. जुन्या भांडणाच्या कारणावरून हा प्रकार घडला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest