फायनान्सची वाहने कमी किंमतीत देतो म्हणत युवकाला घातला १४ लाखाचा गंडा

बँकेने जप्त केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहने कमी किंमतीत घेऊन देतो असे सांगून पुण्यातील हडपसरमधील युवकाची १३ लाख ३९००० रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहर गुन्हे शाखा युनिट सहाने याविषयी तपास केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 18 Aug 2023
  • 05:44 pm
Fraud : फायनान्सची वाहने कमी किंमतीत देतो म्हणून युवकाची घातला १४ लाखाचा गंडा

संग्रहित छायाचित्र

हडपसर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल

बँकेने जप्त केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहने कमी किंमतीत घेऊन देतो असे सांगून पुण्यातील हडपसरमधील युवकाची १३ लाख ३९००० रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहर गुन्हे शाखा युनिट सहाने याविषयी तपास केला आहे.

प्रफुल्ल उबाळे (रा. हडपसरपुणे)कमल उबाळे (रा. हडपसर, पुणे), अविनाश कदम (रा. हडपसर, पुणे) आणि सुभाष रसाळ (रा. हडपसर, पुणे) या चौघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिरुद्ध शरद राऊत (रा. भागीरथी नगर, साडेसतरा नळीहडपसर) यांनी तक्रार दिली आहे.

हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिरुद्ध राऊत हा हडपसर येथे शिक्षण घेत आहे. त्याला स्वतःच्या वापरासाठी एक दुचाकी लागत असल्याने त्याने याबाबत त्याचा मिञ दीपक आंधळे यास विचारणा केली. त्यावेळी दीपक आंधळे याने त्यास प्रफुल उबाळे यांचा गाड्या विकण्याचा व्यवसाय आहे. त्यांची मी ओळख करून देतो म्हणून भेट करून दिली. त्यावेळी उबाळे यांनी राऊतला मी श्रीराम फायनान्स व इतर फायनान्सचे काम करतो आणि मी तुला या गाड्यांच्या विक्रीच्या व्यवसायात भरपूर पैसे कमवून देईल असे सांगून विश्वास संपादन केला.

त्यानंतर उबाळे यांनी मुंढवा येथील एका फायनान्सच्या गोडाऊनमध्ये नेऊन काही गाड्या दाखवल्या आणि सांगितले की या गाड्या आयसीआयसीआय बँकेने जप्त केलेले गाड्या असून या गाड्या फक्त माझ्या मार्फत विकल्या जातात. तसेच गाडी खरेदी केल्यानंतर एक महिन्यानंतर गाडीची कागदपत्रे मिळतात. उबाळेच्या बोलण्यावर विश्वास पटल्याने राऊतने त्याला दुचाकीची मागणी केली.

उबाळे याने ६५ हजार बाजारभाव असलेली एक दुचाकी ३२ हजार रुपयांना दिल्याने राऊतचा उबाळेवर विश्वास निर्माण झाला. त्यानंतर उबाळे हा वेळोवेळी आलिशान गाड्यातून राऊत यास भेटू लागला आणि या गाड्यांच्या व्यवसायातून किती पैसे कमवतो हे सांगत होता. या सर्व गोष्टींवर विश्वास घातल्यामुळे राऊतने त्याच्याकडून एक चारचाकी व सहा दुचाकी इतकी वाहने घेतली. उद्या सर्व गाड्यांची पैसे ऑनलाईन स्वरूपात दिले. त्यानंतर उबाळे यांनी व्हाट्सअप वर त्यांना काही गाड्यांची माहिती व फोटो पाठवले त्यांच्या किमती बाजार किमतीपेक्षा कमी असल्याने राऊतने उबाळे यांना कॅश व ऑनलाइन स्वरूपात १३ लाख ३९ हजार रुपये दिले.

परंतु ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे उबाळेंनी टाळाटाळ करण्यास सुरवात केल्याने रसाळ यांनी त्यांना भेटून गाडी व पूर्वीच्या वाहनांची कागदपत्रे मागणी केली असता उबाळे यांचा ड्रायव्हर अविनाश कदम याने राऊतला आमचा मालक मोठा माणूस आहे, त्याच्या नादी लागू नको त्याचा पार्टनर सुभाष रसाळ आहे. तुझ्यासारखी किती पोर आली आणि गेली त्यांना काही फरक पडत नाही तसेच त्यांची आई कमल उबाळे ही एका संघटनेची अध्यक्ष आहे, अश्या स्वरूपाच्या धमक्या दिल्याने राऊत याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest