जुन्या वादातून धायरीत दोन गटांत हाणामारी

सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात जुन्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरुन दोन गटांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 22 Nov 2024
  • 02:08 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात जुन्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरुन दोन गटांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्नील संतोष खिरीड (वय २०, रा. लायगुडे वस्ती, अंबाईदरा, धायरी) याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अथर्व दोडके, अथर्व शिंदे, अविनाश शिळीमकर, कुणाल जाधव, आदित्य म्हस्के यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिळीमकर, म्हस्के, दोडके यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी आरोपी स्वप्नीलच्या घरी आले. 'तुझा भाऊ कोठे आहे', अशी विचारणा केली. त्यानंतर आरोपींनी खिरीड याच्यावर कोयते उगारले. त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. एका महिलेला शिवीगाळ करुन तिच्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिली, असे खिरीडने फिर्यादीत नमूद केले आहे. तर आरोपी शिळीमकर याने परस्परविरोधी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, अमित कदम, ओंकार भोसले यांच्यासह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिळीमकर आणि त्याचे मित्र धायरीतील पोकळे वस्ती परिसरात थांबले होते. आरोपी कदम, भोसले आणि साथीदार तेथे आले. त्यांनी शिळीमकर याच्या अंगावर मोटार घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद शिळीमकर याने दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव आणि उपनिरीक्षक बुनगे तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest