मतदानाचे चित्रीकरण सोशल मीडियावर अपलोड ; मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाणाऱ्या तरुणाला अटक

तुतारी चिन्हाला मतदान करून मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरण करीत ते सोशल मीडियावर अपलोड केले. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पिंपळे निलख येथे हा प्रकार घडला असून, याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 21 Nov 2024
  • 06:25 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

तुतारी चिन्हाला मतदान करून मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरण करीत ते सोशल मीडियावर अपलोड केले. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पिंपळे निलख येथे हा प्रकार घडला असून, याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (दि. २०) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास घडली.

मार्टिन जयराज स्वामी (वय २५, रा. विशालनगर, पिंपळे निलख) याला पोलिसांनी अटक केली आहे. निवडणूक विभागाचे अधिकारी नरेंद्र देशमुख यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी देशमुख हे विशालनगर पिंपळे निलख येथील विद्याविनय निकेतन शाळेमध्ये असलेल्या मतदान केंद्रातील बुधवर प्रीसायडिंग ऑफिसर म्हणून नेमणुकीस होते.

आरोपी मार्टिन हा सकाळी सव्वाअकराच्या सुमारास मतदान करण्यासाठी आला. त्याने पोलिसांची नजर चुकवून मतदान केंद्रामध्ये मोबाईल आणला. बॅलेट युनिट व व्हीव्ही पॅट यांचे फोटो काढले. बॅलेट युनिट वरील अनुक्रमांक एक वरील तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीवर बटन दाबून मत टाकल्याचा व तशी स्लीप व्हीव्हीपॅट मध्ये दिसल्याचा फोटो आणि व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ आणि फोटो त्याने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले. यामध्ये त्याने मतदान प्रक्रियेच्या गोपनीयतेचा भंग करत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest