संग्रहित छायाचित्र
जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाने बहिणीच्या पतीला मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. २१) गुरुदेवनगर आकुर्डी येथे घडली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या मेहुण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आसिफ जब्बार मुजावर (वय २५, रा. गुरुदेवनगर, आकुर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या मेहुण्याचे नाव आहे. याप्रकरणी बबलू पैगंबर शेख (वय ३०, रा. गुरुदेवनगर, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबलू शेख आणि त्यांचा मेहुणा आसिफ मुजावर यांचे मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून आसिफ याने बबलू आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केली. बबलू यांच्या घराच्या खिडकीची जाळी तोडली. रमेश लोंढे यांच्या रिक्षाची तोडफोड केली. तसेच बबलू यांना मारहाण करून जखमी केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.