येरवडा कारागृहात पुन्हा राडा... कैद्यावर हल्ला, एक जखमी
पुण्यातील येरवडा कारागृहात मागील काही दिवसात कायद्यांमध्ये हाणामारी आणि प्राणघातक खाल्ल्यांच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. एका कैद्याने दुसऱ्या कैद्यावर पातळ पत्र्याच्या तुकड्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बरॅक नंबर आठमध्ये घडली.
या प्रकरणी रोहन अविदास माने (रा. सूर्यनगरी, बारामती) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत ऋषभ शेवाळे हा जखमी झाला आहे. रिषभ शेवाळे हा बरॅक नंबर आठ मधील पडवीमध्ये उभा होता. त्यावेळी रोहन माने तेथे आला. त्याने खिशातील पातळ पत्र्याचा तुकडा काढला. काहीही कारण नसताना ऋषभ वर हल्ला करून त्याच्या डाव्या गालावर आणि डाव्या भुवईच्या बाजूला वार करून जखमी केले. याप्रकरणी पोलीस शिपाई संतोष जगताप यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक काटेक करीत आहेत.