Molestation : यूपीएससीच्या विद्यार्थिनीचा क्लास चालकाकडून विनयभंग

यूपीएससी (UPSC) आणि एफवाय बी कॉम च्या क्लाससाठी जाणाऱ्या तरुणीचा क्लास चालकाने विनयभंग (Molestation)केल्याची घटना समोर आली आहे. यासोबतच तिच्यासोबत वारंवार अश्लील संवाद साधत तिला प्लास्टिकच्या छडीने मारहाण केल्याचे देखील

Molestation

यूपीएससीच्या विद्यार्थिनीचा क्लास चालकाकडून विनयभंग

पुणे : यूपीएससी (UPSC) आणि एफवाय बी कॉम च्या क्लाससाठी जाणाऱ्या तरुणीचा क्लास चालकाने विनयभंग (Molestation)केल्याची घटना समोर आली आहे. यासोबतच तिच्यासोबत वारंवार अश्लील संवाद साधत तिला प्लास्टिकच्या छडीने मारहाण केल्याचे देखील फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार जून पासून १८ नोव्हेंबर २०२३ या कालावधी दरम्यान मॉडेल कॉलनीमध्ये असलेल्या ऑयलर अकॅडमी मध्ये घडला. चतुशृंगी पोलिसांनी याप्रकरणी २८ वर्षीय क्लास चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

Corona Scam : पुणे महापालिकेत कोविड घोटाळा, तात्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारतीसह तिघांवर गुन्हा दाखल

अमित सिमरनवर (Amit Simranvar) (वय २८, रा. मिटकॉन कॉलेज मागे, बालेवाडी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी १९ वर्षीय पीडित महिलेने तरुणीने फिर्याद दिली आहे. पीडित तरुणी सिमरनवर याच्याकडे यूपीएससी आणि एफवाय बीकॉमचा क्लास करते. ती क्लासला गेल्यानंतर आरोपीने तिला घरातील कामे करायला लावली. काम न केल्यास हाताने आणि त्याच्याकडे असलेल्या प्लास्टिकच्या छडीने पायावर पाठीवर मारहाण केली. त्यानंतर तिच्याशी पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या लैंगिक भावनांबाबत आणि त्यांच्या अवयवांबाबत टिप्पणी करीत अश्लील संवाद साधला.. तिला वारंवार या विषयावरून बोलून  विनयभंग केला. तसेच तिच्या आई-वडिलांच्या लैंगिक संबंधांबाबत सुद्धा अश्लील टिप्पणी करून त्याबाबत तिच्याकडे वारंवार विचारणा केली, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest