खेड: मामानेच केला भाच्याचा खून

डोक्‍यात लाकडी ठोकळा मारून तसेच गळा दाबून मामाने भाच्‍याचा खून केला. ही घटना खेड तालुक्‍यातील रासे गावाच्‍या हद्‌दीत गुरुवारी (दि. १९) सकाळी उघडकीस आली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 20 Sep 2024
  • 03:52 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे: डोक्‍यात लाकडी ठोकळा मारून तसेच गळा दाबून मामाने भाच्‍याचा खून केला. ही घटना खेड तालुक्‍यातील रासे गावाच्‍या हद्‌दीत गुरुवारी (दि. १९) सकाळी उघडकीस आली.

संदीप खांडे (वय ४०, रा. ठाकर वस्ती, रासे, ता. खेड, जि. पुणे) असे खून झालेल्‍या भाच्‍याचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी सुरेश मेंघळ (वय ३६, रा. ठाकर वस्ती, रासे) याला अटक केली असून त्‍याने खुनाची कबुली दिली.

साहाय्यक आयुक्‍त राजेंद्रसिंह गौर यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रासे गावात याचा खून झाल्याचे गुरुवारी  सकाळी आढळून आले. पोलिसांनी आरोपी सुरेश मेंघळ याला ताब्‍यात घेतले असता त्‍याने खुनाची कबुली दिली. मयत संदीप हा आरोपी सुरेश यांचा भाचा आहे. यापूर्वी दारू प्‍यायल्‍यावर दोन-तीन वेळा त्‍या दोघांमध्‍ये भांडण झाले होते. अनंत चतुर्दशीच्‍या दिवशी हे मामा भाचे वाद्य वाजवण्‍यासाठी मुंबईला गेले होते. त्‍यांना प्रत्‍येकी ४४० रुपये मानधन मिळाले. त्‍यामुळे बुधवारी ते पुन्‍हा दारू प्‍यायला बसले. त्‍यावेळी त्‍यांच्‍यात पुन्‍हा भांडण झाले. यामुळे संतापलेल्‍या मामा सुरेश मेंघळ याने सरपणाचा ओंडका संदीप खांडे याच्‍या डोक्‍यात मारला. यामुळे संदीप हा गंभीर जखमी झाला. त्‍यानंतर आरोपी सुरेश याने गळा दाबून संदीपचा खून केला. गुन्‍हा घडल्‍यावर चाकण पोलिसांनी आरोपीला त्‍वरित अटक केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest