कंपनीतून तेल आणि एनर्जी ड्रिंक चोरताना दोघांना अटक

कंपनीमधून दोघांनी रिफाइंड तेल आणि रेडबुल एनर्जी ड्रिंक चोरण्याचा प्रयत्न केला. चोरी करताना दोघांना पकडण्यात आले आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Pimpri Chinchwad Crime

संग्रहित छायाचित्र

कंपनीमधून दोघांनी रिफाइंड तेल आणि रेडबुल एनर्जी ड्रिंक चोरण्याचा प्रयत्न केला. चोरी करताना दोघांना पकडण्यात आले आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना २८ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत स्टेलर व्हॅल्यू चेन सोल्युशन प्रा ली या कंपनीत महाळुंगे येथे घडली. (Pimpri Chinchwad Crime) 

राहुल उदाने, प्रथमेश गावडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रमणीरंजन घनशाम साहू (वय ३७, रा. चाकण) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल उदाने आणि प्रथमेश गावडे हे फिर्यादी साहू काम करत असलेल्या स्टेलर व्हॅल्यू चेन सोल्युशन प्रा ली या कंपनीत काम करतात. राहुल आणि प्रथमेश यांनी रिफाइंड तेलाचे २६ पाकीट आणि रेडबुल एनर्जी ड्रिंकचे २४ कॅन चोरी करण्याचा प्रयत्न केला. चोरी करताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest