पिंपरी-चिंचवड : 'साईड देता येत नाही का' देत नाही म्हणत पिकअप चालकाला मारहाण

रस्त्याने जात असताना साईड देण्याच्या कारणावरून रिक्षाचालक आणि साथीदाराने एका पिकअप चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी (२५ एप्रिल) सकाळी पुणे-नाशिक रोडवर तळेगाव चौक, चाकण येथे घडली.

Pimpri Chinchwad Crime

संग्रहित छायाचित्र

# चाकण : रस्त्याने जात असताना साईड देण्याच्या कारणावरून रिक्षाचालक आणि साथीदाराने एका पिकअप चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी (२५ एप्रिल) सकाळी पुणे-नाशिक रोडवर तळेगाव चौक, चाकण येथे घडली. (Pimpri chinchwad crime) 

अभिषेक बाळासाहेब कोंढावळे (वय २७, रा. पिंपळे गुरव) यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंगेश अशोक लोखंडे, रोहित शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कोंढावळे हे पिकअप घेऊन पुणे-नाशिक महामार्गावरून जात होते. त्यांच्या पाठीमागून एक रिक्षा आली. रिक्षाचालकाने हॉर्न वाजवल्याने कोंढावळे यांनी पिकअप थांबवले. त्यानंतर आरोपी मंगेश याने कोंढावळे यांना 'साईड देता येत नाही का' असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. आरोपी रोहित शिंदे याने हातातील स्टीलच्या कड्याने मारून जखमी केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest