Bhosari Crime : पाय हलवू नको म्हटल्याने पतीला बांधून खून करण्याचा प्रयत्न

पतीवर चाकूने वार करत त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि. १६) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास भोसरीतील चक्रपाणी वसाहतीत घडली. यात पती गंभीर जखमी झाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 18 Sep 2023
  • 02:09 pm
Bhosari Crime : पाय हलवू नको म्हटल्याने पतीला बांधून खून करण्याचा प्रयत्न

पाय हलवू नको म्हटल्याने पतीला बांधून खून करण्याचा प्रयत्न

पाय हलवू नको म्हटल्याने पत्नीने पतीला दोरीने बांधले. त्यानंतर पतीवर चाकूने वार करत त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि. १६) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास भोसरीतील चक्रपाणी वसाहतीत घडली. यात पती गंभीर जखमी झाला आहे.

विजयसिंह शहाजी गायकवाड (वय २८, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे जखमी पतीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजयसिंह हे त्यांच्या पत्नीसोबत घरात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी पत्नी सतत पाय हलवत होती. म्हणून विजयसिंह यांनी पत्नीला 'पाय हलवू नको. मी पाय न हलवता बसू शकतो' असे सांगितले. याचा पत्नीला राग आला. काही वेळाने पत्नीने विजयसिंह यांना 'मी तुमचे पाय बांधते, तुम्ही तसेच बसून दाखवा' असे म्हटले.

त्यासाठी विजयसिंह यांनी होकार दिला असता त्यांच्या पत्नीने त्यांचे हात, पाय दोरीने बांधले. तोंडावर चिकट टेप लावला. कपड्याने डोळे झाकले. त्यानंतर विजयसिंह यांच्या छातीवर बसून त्यांच्या गळ्यावर आणि हातावर मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest