संग्रहित छायाचित्र
आपला पती पुरेसा वेळ आणि लक्ष देत नसल्यामुळे संतापलेल्या ३२ वर्षीय पत्नी पतीला धड शिकवण्सासाठी थेट एका आयटी कंपनीला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. धक्कादायक म्हणजे, धमकीसाठी महिलेने पतीच्या ई-मेलाचा वापर केला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीसांनी महिलेला अटक केली आहे.
आरोपी महिला कोंढवा येथील एका खासगी कोचिंग संस्थेत इंग्रजीच्या शिक्षिका आहे. तर तिचा नवरा आयटी कर्मचारी आहे. मात्र, ज्या कंपनीला महिलेने धमकीचा ई-मे पाठवला त्या कंपनीत पतीने नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या ई-मेलमध्ये आयटी कंपनीत बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला होता. सध्या आषाढी वारी आणि G-20 संमेलनामुळे पोलीस बंदोस्तात व्यस्त आहेत. अशातच धमकीचा ई-मेल आल्यानंतर यामध्ये संबंधीत पतीचा फोन नंबर असल्याचे समजताच पोलीसांनी पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
पोलीसांनी ई-मेलचा आयपी अॅड्रेस तपासला. त्यानंतर पत्नीने पतीच्या टॅबवरून हा ई-मेल पाठवल्याचे उघड झाले. पोलीसांनी आरोपीला महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, पतीने यापूर्वी पत्नीला घटस्फोट मागितला होता. परंतु दोघांनाही समज देऊन घटस्फोट घेण्यापासून थांबवण्यात आले होते. सध्या पती आपल्याकडे लक्ष देत नसल्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी बॉम्बची धमकी देणारा मेल पाठवला, असल्याचे महिलेने सांगितले. महिलेला पोलीसांनी अटक केली असून तिच्यावर कलम ५०६ (२) आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांखाली चंदन नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. चंदननगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.