Pune Crime News : गर्लफ्रेंन्डला इंप्रेस करण्यासाठी बहाद्दरांनी चोरले तब्बल 15 मोबाईल

गर्लफ्रेंन्डला प्रत्येक वेळी वेगवेगळे मोबाईल फोन दाखवून इंप्रेस करण्यासाठी मोबाईल चोरी (Mobile theft) करणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलीसांनी (bharati vidyapeeth police) जेरबंद केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Fri, 27 Oct 2023
  • 03:21 pm
Pune Crime News

गर्लफ्रेंन्डला इंप्रेस करण्यासाठी बहाद्दरांनी चोरले तब्बल 15 मोबाईल

भारती विद्यापीठ पोलीसांनी केले जेरबंद कौशल्यपूर्ण कामगिरी

पुणे : गर्लफ्रेंन्डला  प्रत्येक वेळी वेगवेगळे मोबाईल फोन दाखवून इंप्रेस करण्यासाठी मोबाईल चोरी (Mobile theft) करणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलीसांनी (bharati vidyapeeth police) जेरबंद केले आहे. अर्जुन महादेव शेलार, (Arjun Mahadev Shelar) (वय 18 वर्षे 6 महीने, रा. मु.पो भिवरी, ता. पुरंदर),  प्रेम राजु शेलार (वय 20 वर्षे, रा. मु.पो भिवरी, ता. पुरंदर) अशी त्यांची नावे आहेत.

 भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग  करीत असताना पोलीस अंमलदार मंगेश पवार व निलेश खैरमोडे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, कात्रज तलाव येथे दोन जण चोरीच्या मोबाईल फोनची विक्री करता आले आहेत. कात्रज तलाव येथे जावून पाहिले असता या दोघांच्या बॅगमध्ये १५ मोबाईल फोन सापडले.   फोनबाबत  तपास करता त्यांनी  मोबाईल फोन है कात्रज, गोकुळनगर, कोंढवा भागातुन चोरी केले असुन ते विक्री करता आलो असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.  

 भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श विनायक गायकवाड,  पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, पोलीस अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारावकर, निलेश ढमढेरे, अवधतु जमदाडे, अभिजीत जाधव, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest