Pune Crime News : तेरा वर्षीय मुलाकडून सहा वर्षीय मुलीवर बलात्कार

अवघ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलाने सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मोहम्मद वाडी येथील कृष्णा नगर स्मशानभूमी जवळ असलेल्या एका घरामध्ये घडली.

तेरा वर्षीय मुलाकडून सहा वर्षीय मुलीवर बलात्कार

पुणे : अवघ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलाने सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मोहम्मद वाडी येथील कृष्णा नगर स्मशानभूमी जवळ असलेल्या एका घरामध्ये घडली. याप्रकरणी कोंढवा पोलीस (Kondhwa Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुलाच्या पालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. (Pune Crime News)

या 13 वर्षीय मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या 26 वर्षी आईने फिर्याद दिली आहे. आरोपी हा पीडित मुलीच्या घराच्या शेजारीच राहतो. पीडित मुलगी अवघी सहा वर्षांची आहे. ती आरोपीच्या घरी खेळण्यासाठी गेलेली होती. त्यावेळी आरोपीने तिचे कपडे काढले आणि त्याचे स्वतःचे देखील कपडे काढले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. ही घटना पीडित मुलीचा लहान मुलगा भाऊ याने पाहिली आणि त्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यांनी धावत जाऊन घरी या संदर्भात माहिती दिली.  त्यानंतर या मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest