संग्रहित छायाचित्र
कौटुंबिक वादातून पत्नीचा पतीने चाकूने वार करत गळा चिरून खून केला. खून करुन पती स्वतः पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात हजर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
लक्ष्मी केशव सीताफळे (वय ४०, रा. लेबर कॅम्प, पाटीलबुवानगर, खराडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. लक्ष्मीचा पती केशव भीमराव सीताफळे (वय ४५) याला पोलीसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी आणि पती केशव यांच्यात कौटुंबिक कारणावरुन वाद झाले होते. केशवने पत्नीला शिवीगाळ करुन तिचा गळा चाकूने चिरला. पत्नीचा खून करुन तो पोलीस ठाण्यात हजर झाला. प्राथमिक चौकशीत कौटुंबिक वादातून तिचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चंदननगर पोलीस करत आहेत.