काका-काकूंनी कहरच केला ! चांदणी चौकातील शोभेची झाडे नेली चोरून
पुण्यातून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. पुणे-बंगळुरू द्रुतगती महामार्गावरील चांदणी चौकात शोभेची झाले लावण्यात आले आहेत. मात्र, ही शोभेची झाडे एका चारचाकीमधून आलेल्या काका-काकूनेच पळवली असल्याचे समोर आले आहे. भरदिवसा रस्त्यावरील झाडे चोरी केल्याने सुशोभीकरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त झाले होते. त्यातून सुटका करण्यासाठी थेट ४०० कोटी रुपये खर्चून येथे मोठा प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते. प्रकल्पासोबतच सुशोभीकरणासाठी रणगाड्यासह रस्त्याच्याकडे झाडे लावण्यात आली आहेत.
मात्र, आज पहाटेच्या सुमारास एका चारचाकीमधून काका-काकू आले. त्यांनी रस्त्याच्या कडेला वाहन थांबवले. त्यानंतर चांदणी चौक महामार्गावर लावण्यात आलेली शोभेची झाडे चोरून नेली. धक्कादायक बाब म्हणजे, भरदिवसा असा प्रकार घडल्यामुळे सुशोभीकरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जर दिवसा झाडे चोरीला जात असतील तर मग इतर वेळेचे काय ? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.