Ex-Corporator Uday Joshi : माजी नगरसेवक उदय जोशी आणि त्यांच्या मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

बँकेपेक्षा चांगला परतावा देण्याच्या आमिषाने गॅस एजन्सीत रक्कम गुंतव्हायला लावून नऊ जणांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उदय जोशी(Uday Joshi) आणि त्यांच्या मुलाविरुद्ध पुणे पोलिसांनी (Pune Police) गुन्हा नोंदविला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Fri, 27 Oct 2023
  • 10:50 am
Ex-Corporator Uday Joshi

संग्रहित छायाचित्र

पुणे :  बँकेपेक्षा चांगला परतावा देण्याच्या आमिषाने गॅस एजन्सीत रक्कम गुंतव्हायला लावून नऊ जणांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उदय जोशी(Uday Joshi) आणि त्यांच्या मुलाविरुद्ध पुणे पोलिसांनी (Pune Police) गुन्हा नोंदविला आहे.  जोशी यांनी याप्रकरणात जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी फेटाळून लावला.

गुंतवणूकदारांची पाच कोटी ५३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक उदय त्र्यंबक जोशी (Uday Trimbak Joshi) आणि त्यांचा मुलगा मयुरेश यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ठेकेदार मंगेश खरे यांनी फिर्याद दिली होती. 

फसवणूक प्रकरणात आतापर्यंत नऊजणांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी दिल्या आहेत. जोशी यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगी नसताना वार्षिक १२ टक्के व्याजदराची बनावट प्रमाणपत्र देऊन अनेकांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest