Pune Crime News : विश्रांतवाडीत वडिलांचा मुलानेच केला खून, गाढ झोपेत असताना केले सपासप वार

काम कर, चांगले रहा, असे सांगितल्याने मुलाने वडिलांवर कात्रीने सपासप वार करुन त्यांचा खून केला. यावेळी वडिलांवर हल्ला करणाऱ्या मुलाला थांबवण्याचा आईने प्रयत्न केला. मात्र, मुलाने आईवरही हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 19 Sep 2023
  • 01:12 pm
विश्रांतवाडीत वडिलांचा मुलानेच केला खून

संग्रहित छायाचित्र

पोलीसांनी आरोपी मुलाला केली अटक

काम कर, चांगले रहा, असे सांगितल्याने मुलाने वडिलांवर कात्रीने सपासप वार करुन त्यांचा खून केला. यावेळी वडिलांवर हल्ला करणाऱ्या मुलाला थांबवण्याचा आईने प्रयत्न केला. मात्र, मुलाने आईवरही हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात घडली. या प्रकरणी पोलीसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

लक्ष्मण सुरेश मंजुळे (वय ५५, रा. मास्टर कॉलनी, टिंगरेनगर) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर आरोपी मुलगा शिवनाथ लक्ष्मण मंजुळे (वय २०) याला पोलीसांनी अटक केली आहे. या प्रकरणी शिवनाथचा मामा बाबू दांडेकर (वय ३६, रा. टिंगरेनगर) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवनाथ काही काम करत नव्हता. त्यामुळे वडील लक्ष्मण यांनी त्याला काम करण्यास सांगितले होते. काम कर, चांगले रहा, असे त्यांनी त्याला सांगितले होते. मात्र, काम न करता मध्यरात्री दीडच्या सुमारास मुलगा शिवनाथने झोपेत असलेल्या वडिलांवर घरातील कात्रीने सपासप वार केले. यात त्यांच्या छाती आणि पोटावर वार करण्यात आले.

मुलाने केलेला हल्ला पासून आईने मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोखण्यासाठी आलेल्या आईवरही मुलाने वार केले. यात आई गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी बाबू दांडेकर यांच्या फिर्यादीनंतर मुलाला अटक करण्यात आली आहे. विश्रांतवाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest