Pimpri Chinchwad Crime : जाब विचारल्याच्या रागातून दुचाकी पेटवली

मोठ्याने शिव्या देण्याचा जाब विचारल्याने एकाने जाब विचारणाऱ्या तरुणाची दुचाकी पेट्रोल ओतून जाळून टाकली. ही घटना बुधवारी (दि. 29) पहाटे चार वाजताच्या सुमारास चाकण मधील खंडोबा माळ येथे घडली.

Pimpri Chinchwad Crime

संग्रहित छायाचित्र

मोठ्याने शिव्या देण्याचा जाब विचारल्याने एकाने जाब विचारणाऱ्या तरुणाची दुचाकी पेट्रोल ओतून जाळून टाकली. ही घटना बुधवारी (दि. 29) पहाटे चार वाजताच्या सुमारास चाकण मधील खंडोबा माळ येथे घडली. (Pimpri Chinchwad Crime)

समीर रेहमत अन्सारी (Sameer Ansari) (रा. खंडोबा माळ, चाकण) याला पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. याबाबत 57 वर्षीय महिलेने चाकण पोलीस (Chakan Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाने मागील दीड महिन्यापूर्वी आरोपी समीर याला मोठ्याने शिव्या का देतो, असा जाब विचारला होता. त्या रागातून समरी याने फिर्यादी यांच्या मुलाची 70 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14/डीएस 1630) पेट्रोल ओतून जाळून टाकली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest