Vasant More : बलात्कार प्रकरणातील आरोपी मोकाट; वसंत मोरे यांनी केली एनजीओच्या ऑफिसची तोडफोड

अल्पवयीन मुलींना एनजीओच्या ( स्वयंसेवी संस्था )ऑफिसमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार (Sexual assault) करणारा पुणे आरपीएफचा (रेल्वे पोलीस दल) कर्मचारी अनिल पवार (Anil Pawar) हा गुन्हा दाखल होऊन महिना होता आला तरी फरार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Wed, 8 Nov 2023
  • 11:03 am
Vasant More

बलात्कार प्रकरणातील आरोपी मोकाट; वसंत मोरे यांनी केली एनजीओच्या ऑफिसची तोडफोड

पुणे : अल्पवयीन मुलींना एनजीओच्या ( स्वयंसेवी संस्था )ऑफिसमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार (Sexual assault) करणारा पुणे आरपीएफचा (रेल्वे पोलीस दल) कर्मचारी अनिल पवार (Anil Pawar) हा गुन्हा दाखल होऊन महिना होता आला तरी फरार आहे. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More)  यांनी एनजीओच्या कार्यालयाची तोडफोड केली.

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात एका इमारतीमध्ये हे एनजीओ कार्यालय आहे. अनिल पवार आणि त्याचा साथीदार कमलेश तिवारी यांनी एका अल्पवयीन मुलीवर सलग पाच दिवस याच इमारतीमध्ये बलात्कार केला. 

आमच्या आयाबहिणीवर अत्याचार सहन करणार नाही. या संस्थेवर बंदी आणली पाहिजे. जे लोकं संचालक आहेत त्यांच्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. वेळ पडली तर आरपीएफच्या ऑफिसमध्ये घुसायला मागे पुढे राहणार नाही, असा इशारा वसंत मोरे यांनी दिला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest