संग्रहित छायाचित्र
व्यवसायासाठी चार कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत एकाला सात लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी एकाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या आधारे तन्मय रमेश जाधव (रा. औदुंबर दर्शन सोसायटी, फातिमानगर, वानवडी) याच्या विरोधात समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. त्यांची एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत आरोपी तन्मय जाधवशी ओळख झाली होती. फिर्यादीला व्यवसायासाठी चार कोटी रुपयांचे कर्ज हवे होते. जाधवने व्यंकटेश्वरा एंटरप्रायजेस या खासगी वित्तीय संस्थेकडून १५ दिवसात चार कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे आमिष त्यांना दाखविले. त्यानंतर फिर्यादीला त्याने रास्ता पेठेतील एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले. तेथे त्यांच्याबरोबर मुद्रांकावर करारनामा केला.
कर्ज मंजुरीसाठी फिर्यादींकडून वेळोवेळी सहा लाख ८७ हजार रुपये जाधवने घेतले. मात्र, त्यांना कर्ज दिले नाही. याबाबत व्यावसायिकाने त्याच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक जे. आर. फडतरे यधा प्रकरणाचा तपास करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.