लाडक्या बहिणीच्या नावाने वृद्ध महिलेचे दागिने लंपास

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर महायुतीने बहिणीच्या नावावर दरमहा १५०० रुपये देणारी लाडकी बहीण योजना लोकप्रिय झाली. या योजनेमुळे महायुतीला विधानसभेत भरभरून मते मिळाली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 1 Dec 2024
  • 03:48 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर महायुतीने बहिणीच्या नावावर दरमहा १५०० रुपये देणारी लाडकी बहीण योजना लोकप्रिय झाली. या योजनेमुळे महायुतीला विधानसभेत भरभरून मते मिळाली. याच लाडक्या बहिणीच्या नावाने आता महिलांची फसवणूक करण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहिणीचे पैसे देत असल्याचे सांगून एका चोरट्याने वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि अंगठी असा ८० हजार रुपयांचा ऐवज हातचलाखीने काढून घेतला आहे.

याबाबत हडपसर येथील एका ७० वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना हडपसरमधील कर्मवीर भाऊराव पाटील १५ नंबर चौकात २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सकाळी स्वस्त धान्य दुकानाचे कुपन घेऊन घरी परत जात  होत्या. यावेळी पेट्रोल पंपाजवळ एक जण त्यांना भेटला. त्याने सांगितले की, ‘‘चला मावशी येथे एक साहेब लाडकी बहिणीचे पैसे वाटप करीत आहेत,’’ असे बोलून तो फिर्यादी महिलेला घेऊन भाऊराव पाटील १५ नंबर चौकात घेऊन आला. तेथे फिर्यादी यांना तो म्हणाला, ‘‘या ठिकाणी बसा. येथे ५ हजार रुपये वाटत आहे,’’ असे सांगून तो निघून गेला. बराच वेळ वाट पाहून त्या घरी निघून आल्या. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि अंगठी दिसून आली नाही. बोलण्यात गुंतवून चोरट्याने  गळ्यातील ८० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलीस हवालदार कांबळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest