पिंपरी-चिंचवड : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कंटेनर उलटला; सात जखमी

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर महामार्गावर उलटला. या अपघातात चार वाहने अडकली. त्यामध्ये सात जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि.१) सायंकाळी पाचच्या सुमारास कामशेत घाटात घडली.

Pune-Mumbai highway accident

पिंपरी-चिंचवड : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कंटेनर उलटला; सात जखमी

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर महामार्गावर उलटला. या अपघातात चार वाहने अडकली. त्यामध्ये सात जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि.१) सायंकाळी पाचच्या सुमारास कामशेत घाटात घडली.

अनिकेत संतोष शिंदे (वय २१, रा. नेरुळ, मुंबई), यज्ञेश मधुकर गोलंबे (वय १९, रा. नेरुळ, मुंबई), अनिकेत संतोष शिंदे, अंगथाई फ्रू मोग (वय २५, रा. त्रिपुरा), अनुसया प्रभाकर खांडेकर (वय ५०, रा. कुसगाव, मावळ), चिंगुबाई लहु सुराणा (वय ३०, रा. कामशेत), अशोक रामचंद्र गवित (रा. कोरडा, ता. नवापूर, जि. नंदूरबार) अशी जखमींची नावे आहेत.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना पुणे मुंबई महामार्गावरून जात असलेल्या एका कंटेनर (एमएच-४३/टीएल ९७१०) चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. कामशेत घाटाजवळ जय मल्हार हॉटेलजवळील वळणावर कंटेनर मुंबई लेनवर गेला आणि पलटी झाला. कंटेनरमधील मोठा लोखंडी पाईप रस्त्यावर पडला. त्यात चार वाहने अडकली.

ह्युंदाई आय-२०(एमएच-४३/बीबी ७८७३) या कारमधील प्रवासी अनिकेत शिंदे आणि यज्ञेश गोलंबे हे जखमी झाले. एका इको गाडीचे (एमएच-१४/एसएच ३२६५) मोठे नुकसान झाले आहे. दुचाकी (एमएच-१२/केएन ७९४९) वरील अनिकेत शिंदे आणि अंगथाई फ्रू मोग हे जखमी झाले. तसेच पादचारी महिला अनुसया खांडेकर, चिंगुबाई सुराणा या देखील जखमी झाल्या. कंटेनरचालक अशोक गावित याच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला. याबाबत त्याच्या विरोधात कामशेत पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अशोक गावित हा देखील जखमी झाला आहे. कामशेत पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest