संग्रहित छायाचित्र
पुणे : फुकट दारू प्यायला दिली नाही म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्याने हॉटेलमध्ये राडा घातला. विकास आबने असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. हॉटेल बंद असतानाही दारूची मागणी करत नकार दिल्याने हॉटेल मॅनेजर आणि वेटरला मारहाण करण्यात आली.
पुण्यातील 'ड्रामा नाईन हॉटेल'मध्ये हा प्रकार घडला असून हा राडा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या अधिकाऱ्याने वेटरला जबर मारहाण केल्याचे सांगितले जात आहे.
तत्पूर्वी याच अधिकाऱ्याने हॉटेल बाहेर एका जोडप्याला मारहाण केल्याचेही उघड झालं आहे. विशेष म्हणजे पोलिसांना याविषयी कुठलीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले.