संग्रहित छायाचित्र
गर्लफेंडला शिवी का देतो, म्हणत मारहाण एका तरुणाला माहराण करीत चाकू सारख्या हत्याराने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास मोहननगर, चिंचवड येथे घडली.
अभिजित महादेव खाडप (वय २२, रा. पवार वस्ती, ताथवडे) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने शुक्रवारी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चैतन्य राठोड (वय २०, रा. फुलेनगर झोपडपट्टी, मोहननगर, चिंचवड) आणि जय (पूर्ण नाव माहिती नाही, रा. गाय वासरू चौक, मोहनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास फिर्यादी अभिजित खाडप हा मोहनगर येथील गाय वासरू चौकात थांबला होता. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी यांनी आपसांत संगनमत करून गर्लफेंडला शिवी का देतो, असे म्हणत शिवीगाळ करीत मारहाण केली. आरोपी राठोड याने त्यांच्या जवळील चाकू सारख्या हत्याराने छातीच्या खाली, हातावर व डोक्यावर वार करीत जखमी करून पळून गेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.