संग्रहित छायाचित्र
प्रा. जयंत हरीभाऊ सावरकर (वय ५८, रा. सीएमई, दापोडी) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अजमल खान याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी सावरकर हे लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय (सीएमई) यांना एकाने फोन केला. तुम्हाला तुमचे कुरियर हवे असेल तर श्री. ट्रैक कोन कुरीयर दिल्ली या कंपनीला ‘गुगल पे’ वरुन १० रुपये पाठविण्यास सांगितले.
त्यानंतर आरोपी म्हणाला की, ’गुगल पे’ ओपन केल्यानंतर तुमच्या मोबाइलचे सुरुवातीचे पाच अंक टाईप करा' त्यावर फिर्यादीने त्यांचे मोबाईलचे सुरुवातीचे पाच अंक टाईप केले. त्यानंतर आरोपी म्हणाला की, मी आता माझ्या कुरियर वाल्यांना सांगतो की, तुमचे कुरियर पाठविण्याची प्रोसेस करा.
त्यानंतर फिर्यादी यांना फोन आला की तुमच्या सोबत काहीतरी फसवणूक होत आहे. त्यानंतर फिर्यादी हे त्यांच्या दापोडी सीएमई येथील एसबीआय बँकेच्या शाखेत गेले. त्यांनी विचारपूस केली असता त्यांच्या खात्यातून हतीनापूर बारपेटा (आसाम) येथील कॅनरा बँकमध्ये अजमल खान नावाच्या व्यक्तीच्या खात्यावर ९१ हजार ४६९ तसेच धामारायका राय (तामिळनाडू) येथील कॅनरा बँकेमध्ये अजमल खान नावाच्या व्यक्तीच्या खात्यावर ८ हजार ४९९ रुपये असे एकूण ९९ हजार ९६८ ट्रान्सफर करून सावरकर यांची फसवणूक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश वाघमारे तपास करीत आहेत.
वाहन खरेदीवर साडेसहा लाखांचा गंडा
वाहनांच्या शो-रुममध्ये काम करणार्याने ग्राहकांना वाहन खरेदीवर मोठा डिस्काऊंट देण्याचे आमिष दाखवून ६ लाख ६२ हजार रूपयांचा अपहार केला. हा प्रकार वाकडमधील मानकर चौक येथे घडला.
चिराग सुधीर मुथा (रा. गुलटेकडी, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयुरेश सुधाकर वाघमारे (रा. धानोरी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी हा मानकर चौक येथील चेतक ऑरेंज मोटोरॅड या शो-रूमवर सेल्स एक्झुकेटीव्ह या पदावर कामाला होता. त्यावेळी त्याने दहा ग्राहकांना चेतक टू व्हीलर बुक करण्यासाठी जर त्यांनी आरोपीच्या वैयक्तिक खात्यावर पैसे पाठवले.तर त्यांना चेतक टू व्हीलरच्या खरेदीवर मोठा डिस्काउंट मिळवून देईल, असे आमिष दाखवले.