Crime : वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मुलाची डॉक्टरांना मारहाण

वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मुलाने डॉक्टरला मारहाण (beating) केली. तसेच शिवीगाळ केली. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) (YCM Hospital)रविवारी (१० डिसेंबर) दुपारी सव्वादोन वाजता ही घटना घडली.

Pimpri Chinchwad Crime

Pimpri Chinchwad Crime

वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मुलाने डॉक्टरला मारहाण (beating) केली. तसेच शिवीगाळ केली. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) (YCM Hospital)रविवारी (१० डिसेंबर) दुपारी सव्वादोन वाजता ही घटना घडली.

डॉ. ऋषिकेश हनमंत कुदळे (Dr. Rishikesh Hanmant Kudale) (वय २५, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस (Pimpri Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश राजाराम कुंभार (वय २५, रा. वाघोली, ता. वरुड, जि. धाराशिव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. कुदळे हे वायसीएम रुग्णालयात आयसीयू वॉर्डमध्ये नेमणुकीस होते. तिथे महेश कुंभार याचे वडील राजाराम कुंभार यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान राजाराम यांचा मृत्यू झाला. त्याबाबत डॉ. कुदळे यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना दिली.

त्यानंतर राजाराम यांचा मुलगा आरोपी महेश आयसीयू वॉर्डमध्ये आला. त्याने डॉ. कुदळे यांच्याकडे वडिलांच्या मृत्यूबाबत चौकशी केली. त्यानंतर वडिलांच्या बेडजवळ जाऊन थोडा वेळ रडला. त्यानंतर रागाने येऊन डॉ. कुदळे यांना मारहाण करत शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

डॉक्टरांचे आंदोलन

या घटनेच्या निषेधार्थ रविवारी सायंकाळी वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरांनी आंदोलन केले. त्यानंतर प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांच्या मध्यस्थीने हे आंदोलन मागे घेण्यात आले. काही काळ वायसीएम परिसरात तणावाचे वातावरण होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest