पुणे: अनैतिक संबंधातून पत्नीने काढला पतीचा काटा; प्रियकराच्या मदतीने केला खून

पुणे : अनैतिक संबंधातून एका पत्नीने पतीचा काटा काढला असून प्रियकराच्या मदतीने पतीचा खून घडवून आणला. ही घटना कर्वेनगर येथील श्रीमान सोसायटीत मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. पतीवर धारदार हत्याराने वार करण्यात आले होते.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे : अनैतिक संबंधातून एका पत्नीने पतीचा काटा काढला असून प्रियकराच्या मदतीने पतीचा खून (Murder) घडवून आणला. ही घटना कर्वेनगर (Karvenagar) येथील श्रीमान सोसायटीत (Shrimaan Society) मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. पतीवर धारदार हत्याराने वार करण्यात आले होते.

राहुल पंढरीनाथ निवंगुणे (वय ४२)  (Rahul Pandharinath Nivangune) असे खून झालेल्याचे नाव आहे. राहुल हे एका खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करत होते. त्यांना तीन मुली आहेत. वारजे पोलिसांनी (Warje Police) दिलेल्या माहितीनुसार, रात्री एक वाजण्याच्या सुमारास निवंगुणे यांच्या घराचा दरवाजा अज्ञात व्यक्तींनी वाजविला. निवंगुणे यांनी  घराचे दार उघडले. त्याच वेळी बाहेर उभ्या असलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यास सुरुवात केली. दरम्यान, राहुल यांनी आरडाओरडा सुरू केला. जिवाच्या आकांताने ते ओरडत होते. त्यावेळी त्यांच्या तीन मुली आणि पत्नी जागी झाली.  दरम्यान, आरोपींनी घरातील दागिने आणि रोख रक्कम, किंमती वस्तुची लुट केल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती.

आरोपींच्या तोंडावर कापड बांधलेले होते. डोळ्यांदेखत  वडिलांची हत्या झाल्याने मुलींच्या मनावर मोठा आघात झाला आहे. त्या बोलण्याचा मनस्थीतीत नव्हत्या. पोलिसांना या प्रकरणात संशय वाटला. त्यामुळे पोलिसांनी पत्नीकडे कसून तपासाला सुरुवात केली. तिच्याकडे केलेल्या चौकशीत संशय अधिक बळावला. पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जात अखेर या खुनाचा छडा लावला. पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा खून घडवल्याचे समोर आले. पतीला तिचे अनैतिक संबंध समजले होते. या अनैतिक संबंधात तो अडथळा ठरत असल्याने पतीचा काटा काढण्यात आला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest