सौंदर्य प्रसाधनांच्या नावाआडून बनावट गोवा मद्याची तस्करी

पुणे : सौंदर्य प्रसाधनांच्या नावाआडून गोवा राज्यातील बनावट मद्याची अवैध तस्करी करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क, सासवड विभागाने धडक कारवाई करत तब्बल एक कोटी ५१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

Pune News, Pune Crime News, Liquor Seized, State Excise Department

सौंदर्य प्रसाधनांच्या नावाआडून बनावट गोवा मद्याची तस्करी 

तब्बल १ कोटी ५१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त ; राज्य उत्पादन शुल्क, सासवड विभागाची धडक कारवाई

पुणे : सौंदर्य प्रसाधनांच्या नावाआडून गोवा राज्यातील बनावट मद्याची अवैध तस्करी करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क, सासवड विभागाने धडक कारवाई करत तब्बल एक कोटी ५१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

या प्रकरणी सुनिल चक्रवर्ती या आरोपीला अटक केली आहे. गोवा राज्य निर्मित मदयाची अवैध रित्या मोठ्या प्रमाणावर आवक केली जाते. त्या अनुषंगाने निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सासवड विभागाच्या पथकाने मोहिम राबविण्यात आली. पथकाला मिळालेल्या बातमीनुसार वाहनांच्या तपासणी दरम्यान आज (दि.१०) मौजे खेड शिवापूर गावाच्या हद्दीत, हॉटेल जगदंब समोर, सात्तारा-पुणे हायवे रोडलगत संशयित वाहन क्र. एचआर ६३ डी ८८७८ हा १४ चाकी ट्रक थांबवून वाहन चालकांकडे वाहनामध्ये काय आहे, याबाबत चौकशी केली असता, वाहन चालक यांनी संशयितरित्या उत्तर दिल्याने वाहन रोडच्या बाजूला घेवून तपासणी केली असता, वाहनामध्ये गोवा राज्यात निर्मित व विक्रीस असलेले रॉयल ब्लू माल्ट व्हिस्कीच्या १८० मिली क्षमतेच्या ७९,६८० सिलबंद बाटल्या (१६६० बॉक्स), रॉयल ब्लू माल्ट व्हिस्कीच्या ७५० मिली क्षमतेच्या ६४८० सिलबंद बाटल्या (५४० बॉक्स) घटनास्थळी मिळून आले. 

दरम्यान, भारत बेंझ कंपनीच्या ३७२३८ मॉडेलची गाडी क्र. एचआर ६३ डी ८८७८ या वाहनासहित गाडीमध्ये एकूण १ कोटी ५१ लाख ६ हजार ६०० किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला. तसेच एका आरोपीला अटक करण्यात आली. वाहन चालकांकडे मदय वाहतुकी बाबतचे कोणतेही वाहतुक पास, परवाने अथवा कोणतीही कागदपत्रे मिळून आली नाहीत. तसेच हा मदयसाठा विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करुन आणल्याचे आरोपीच्या तपासातुन स्पष्ट झाले आहे. त्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ) (ई), ८०, ८१, ८३, १०, १०३ व १०८ अन्वये सासवड विभागाने गु. र. क्र. १५७/२०२४ (दि.१०) नुसार गुन्हा नोंद करुन विदेशी मदयाचा एकुण १ कोटी २८ लाख १ हजार ६०० किंमतीच्या मुददेमालासह एक १४ चाकी ट्रक तसेच एक मोबाईल असा एकूण १ कोटी ५१ लाख ६ हजार ६०० किंमतीचा मुददेमाल जप्त केला असून वाहनचालक सुनिल चक्रवर्ती या आरोपीला अटक केली आहे.

अधीक्षक चरणसिंग राजपुत यांना मिळालेल्या गोपनिय बातमीनुसार सासवड विभागाच्या पथकाने आज रोजी फक्त गोवा राज्यात विक्रीकरीता असलेल्या मदयावर धडक कारवाई केली. या कारवाईत दुय्यम निरीक्षक प्रदीप मोहिते, राम सुपेकर, रोहित माने, धवल गोलेकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सागर दुबे, संदिप मांडवेकर जवान, भागवत राठोड, तात्या शिंदे, समीर पडवळ, अक्षय महेत्रे, रणजित चव्हाण, राम चावरे, सुनिल कुदळे, दत्तात्रय पिलावरे, अंकुश कांबळे यांनी सहभाग घेतला. सदर गुन्हयाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक प्रदीप मोहिते करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest