Pune Crime News : घरफोडी व जबरी चोरी करणाऱ्या दोघांना सिंहगड रोड पोलीसांनी पकडले

सिंहगड रोड परिसरात घरफोडी (burglary) करून सोन्याची चैन, मोबाईल व रोख रक्कम असा एकुण १,०७,८०० रुपये किंमतीचा ऐवज चोरी करणाऱ्या दोघांना पोलीसांनी पकडले. (Pune Crime News) आपल्या दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने त्यांनी चोरी (Pune Theft) केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sat, 28 Oct 2023
  • 12:20 pm
Pune Crime News

घरफोडी व जबरी चोरी करणाऱ्या दोघांना सिंहगड रोड पोलीसांनी पकडले

पुणे : सिंहगड रोड परिसरात घरफोडी (burglary) करून सोन्याची चैन, मोबाईल व रोख रक्कम असा एकुण १,०७,८०० रुपये किंमतीचा ऐवज चोरी करणाऱ्या दोघांना पोलीसांनी पकडले. (Pune Crime News) आपल्या दोन अल्पवयीन  साथीदारांच्या मदतीने त्यांनी चोरी (Pune Theft) केली.

शिवराज गणेश साखरे (वय १९ वर्षे, रा. सर्व्हे नंबर १६, शिवाजी अपार्टमेन्ट फलॅट नंबर २०२, आंबेगाव पठार आणि  शिवम ज्ञानेश्वर सुरवसे (वय १९ वर्षे रा. सर्व्हे नंबर १६ शुभश्री आंगण, सिल्वहरपार्क जवळ, आंबेगाव पठार) अशी या दोघांची नावे आहेत.

 पोलीस अंमलदार सागर शेडगे व देवा चव्हाण यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, व्हिजन क्रिकेट अॅकेडमी, दौलतनगर, आनंदनगर येथे  चोरी केले मोबाईल फोन विक्री करीता दोघे येणार आहेत . पोलिसांनी सापळा लावून त्यांना पकडले. त्यांनी आपल्या दोन अल्पवयीन  साथीदारांच्या   मदतीने  चोरी केल्याचे तपासात निष्पन्न  झाले.  त्यांच्याकडुन पोलीस कस्टडी दरम्यान १,४८,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.   पुढील  तपास सहायक पोलीस निरीक्षक, सचिन निकम, सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.

वरीष्ठ पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक  सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, देवा चव्हाण, सागर शेडगे, अमोल पाटील, विकास पांडुळे, स्वप्नील मगर, विकास बांदल, राहुल ओलेकर, अविनाश कोंडे, दक्ष पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest