Shocking : पुण्यात शाळेतील ७-८ मुलींचे लैगिक शोषण, पालकांनी केली शाळा बंद

पुण्यातील सहकारनगर परिसरात असणाऱ्या शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील ७ ते ८ मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार घडला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 9 Oct 2023
  • 12:35 pm
Shocking : पुण्यात शाळेतील ७-८ मुलांचे लैगिक शोषण, पालकांनी केली शाळा बंद

पुण्यात शाळेतील ७-८ मुलींचे लैगिक शोषण, पालकांनी केली शाळा बंद

पुण्यातील सहकारनगर परिसरात असणाऱ्या शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील ७ ते ८ मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार घडला आहे. शाळेत मुलींवर अत्याचार झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यानंतर पालकांनी शाळा बंद केली.

सहकारनगर परिसरात असणाऱ्या एका शाळेतील मुलींचे ैंगिक शोषण सुरु असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या शाळेत मुलींवर अत्याचार झाल्याच्या तक्रारी आल्या. अनेक मुलींच्या तक्रारीनंतर पालकांनी एकत्रित शाळा बंद करण्याचे मागणी केली. सध्या पोलीस, पालक, मनसे कार्यकर्ते शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात जमले आहेत.

मनसे कार्यकर्त्यांनी प्रकरण उघडकीस आणले आहे. त्यानंतर शाळा बंद करत पालकांची काही तक्रार असल्यास त्यांनी ती पोलीस स्टेशनमध्ये येऊन देण्याचे आवाहन केले आहे. अनेक मुलींच्या तक्रारीनंतर याबाबत पालकांना पोलीसांनी शाळेतील पुढील कार्यवाही करून गुन्हा नोंद करण्याचे आश्वासन दिले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest