Ex-Corporator Rape : धक्कादायक... माजी नगरसेविकेवर बलात्कार; ओळखीच्या व्यक्तीकडून छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी

सोबत काम करणाऱ्या एका तरुणाशी झालेली मैत्री माजी नगरसेविकेला महागात पडली आहे. या दोघांची खासगी छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची तक्रार पर्वती पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Thu, 5 Oct 2023
  • 11:55 am
Ex-Corporator Rape Threat

संग्रहित छायाचित्र

पुणे : सोबत काम करणाऱ्या एका तरुणाशी झालेली मैत्री माजी नगरसेविकेला महागात पडली आहे. या दोघांची खासगी छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी  (Ex-Corporator Rape Threat ) देत तिच्यावर बलात्कार (Rape) करण्यात आल्याची तक्रार पर्वती पोलीस ठाण्यात दाखल (Parvati Police) करण्यात आली आहे. ही घटना उघडकीस आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

सचिन मच्छिंद्र काकडे (वय ४३, रा. संतोषनगर, कात्रज) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित माजी नगरसेविकेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काकडे आणि पीडित नगरसेविकेचे मैत्री संबंध होते. सुरुवातीला आरोपी त्यांच्याकडे काम करीत होता. त्यांची घनिष्ट मैत्री वाढली. या नगरसेविकेची आक्षेपार्ह छायाचित्रे, ध्वनिचित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची त्याने वारंवार धमकी दिली. त्यानंतर त्याने या महिलेला धमकावत  वेळोवेळी बलात्कार केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

हा प्रकार २०१७ पासून सुरू होता. केवळ शारीरिक शोषणच नव्हे तर त्याने या नागरसेविकेचे आर्थिक शोषण देखील केले.  त्यांना  धमकावत वेळोवेळी दहा लाख रुपये उकळण्यात आले.  काकडे सातत्याने नगरसेविकेला तिच्या पतीला या मैत्री संबंधाबाबत माहिती देतो अशी धमकी देत होता. तिच्याकडून सातत्याने पैशांची मागणी केली जात होती. 

काकडे दोन दिवसांपूर्वी तिच्या घरी गेला. 'तू दुसरा विवाह केला आहे. तुझ्यामुळे माझी पत्नी सोडून गेली आहे', असे सांगून त्याने तिला मारहाण केली. अखेर काकडेच्या त्रासाला कंटाळून तिने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक सचिन निकाळजे तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest