Pune Crime News : इलेक्ट्रिक मोटर चोरी करणारी टोळी शिरुर पोलीसांनी केली गजाआड

इलेक्ट्रिक मोटरची चोरी केल्या प्रकरणी शिरुर पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या चोरट्याकडून शेकडो मोटारीच्या चोरीची उकल होणार असल्याची माहिती शिरुर पोलिसांनी दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Fri, 27 Oct 2023
  • 05:27 pm
Pune Crime News :

इलेक्ट्रिक मोटर चोरी करणारी टोळी शिरुर पोलीसांनी केली गजाआड

इलेक्ट्रिक मोटरची चोरी (Pune Crime News) केल्या प्रकरणी शिरुर पोलिसांनी (Shirur Police) पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या चोरट्याकडून शेकडो मोटारीच्या चोरीची उकल होणार असल्याची माहिती शिरुर पोलिसांनी दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार यामधे सौमित्र नाथा निचित, विकास बबन निचित, सागर हौशीराम रणसिंग तिघे राहणार वडनेर तालुका शिरूर जिल्हा पुणे, संतोष काशिनाथ मेचे,किरण किसन लाळगे दोघे राहणार पारनेर जिल्हा अहमदनगर यांना अटक करून त्यांच्याकडून अण्णापूर मलठण, रामलिंग ,आमदाबाद, वडनेर येथून चोरलेल्या  एकूण आठ इलेक्ट्रिक मोटारी किंमत 72000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . पोलीस स्टेशन शिरूर अंतर्गत दाखल एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे; उपविभागीय पोलीस अधिकारी गवारी, पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचे मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे पोलीस तपास पथक सपोनी अमोल पन्हाळकर पोउपनि सुनिल उगले पोउपनि पाटील पोलिस अंमलदार बी एम मांडगे,उमेश भगत,शिंदे,अजित पवार,नागलोत, विशाल पालवे,थोरात,भोई,जगताप यांनी केली आहे

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest