अल्पवयीन मुलावर तरुणीचे लैंगिक अत्याचार, व्हिडिओ काढून बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी
अल्पवयीन मुलाला धमकावून एका तरुणीने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी २८ वर्षीय तरुणीवर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी १७ वर्षीय मुलाने कोंढवा पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा आणि संबंधित तरुणी शेजारी राहायला आहेत. तरुणीने या मुलाला आपल्या जाळ्यात ओढले. जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवायला लावले.
यावेळीचा व्हिडिओही मोबाईल कॅमेऱ्यावर त्याला काढायला लावला. या व्हिडिओच्या आधारे तुझ्याविरुध्द बलात्कार केल्याची तक्रार पोलीसात देईल, असे धमकावून दोन ते तीन वेळा या मुलाला शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. अखेर तरुणाने पोलीसांत धाव घेतली. त्यानंतर याप्रकरणी तरुणीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.