Lalit Patil : पळून गेलेला ड्रग्स माफिया ललित पाटीलचा पुणे पोलीसांना मिळाला ताबा

ड्रग्स माफिया ललित पाटील (Lalit Patil)प्रकरणाची महत्वाची अपडेट समोर आली आहे ललित पाटीलचा पुणे पोलीसांना (Pune Police) ताबा देण्यात आला आहे. अंधेरी कोर्टाने पुणे पोलीसांना ही परवानगी दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Tue, 31 Oct 2023
  • 01:49 pm
Lalit Patil

ड्रग्स माफिया ललित पाटीलचा पुणे पोलीसांना मिळाला ताबा

पुणे : ड्रग्स माफिया ललित पाटील (Lalit Patil)प्रकरणाची महत्वाची अपडेट समोर आली आहे ललित पाटीलचा पुणे पोलीसांना (Pune Police) ताबा देण्यात आला आहे. अंधेरी कोर्टाने पुणे पोलीसांना ही परवानगी दिली आहे. ललित पाटील हा पुणे पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला होता. त्यानंतर पुणे पोलीसांच्या कामगीवर मोठा प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून ताब्यात घेतले होते. आता पुन्हा एकदा ललित पुणे पोलीसांच्या ताब्यात येणार आहे. 

ललित पाटील, शिवाजी शिंदे आणि चौधरी नावाच्या आरोपीचा ताबा पुणे पोलीसांना मिळाला आहे. ताबा मिळण्यासाठी पुणे पोलीसांकडून काल न्यायालयात प्रोडक्शन वॉरंट दाखल करण्यात आले होते. दरम्यान अंधरी कोर्टाने पुणे पोलीसांना परवानगी दिली आहे. या संदर्भात कायदेशीर प्रकिया झाली पूर्ण झाली असून अडीच वाजेपर्यंत पुणे पोलीस मुंबईतून ललितला घेऊन पुण्याकडे होणार रवाना होणार आहेत. 

पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात उघडकीस आलेल्या ड्रग्स प्रकरणानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. पुणे पोलीस तसेच ससून रुग्णालय प्रशासनाला मोठ्या टीकेला सामोर जावे लागले होते. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest