दारुच्या दुकानावर दरोडा, अवघ्या २ तासात पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका दारुच्या दुकानावर हप्ता वसून करण्यासाठी पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. तसेच यावेळी दुकानावर दगडफेक करून कॅश काऊंटरमधील १० हजार रुपये लुटल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलीसांनी अवघ्या २ तासात ३ आरोपींसह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 30 May 2023
  • 12:12 pm
Robbery : दारुच्या दुकानावर दरोडा, अवघ्या २ तासात पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या

संग्रहित छायाचित्र

हप्ता चालू करण्यासाठी पाच ते सहा जणांनी टाकला दरोडा

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका दारुच्या दुकानावर हप्ता वसून करण्यासाठी पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. तसेच यावेळी दुकानावर दगडफेक करून कॅश काऊंटरमधील १० हजार रुपये लुटल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलीसांनी अवघ्या २ तासात ३ आरोपींसह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई भारती विद्यापीठ पोलीसांनी केली आहे.

सोहेल मोदीन आसंगी (वय २२, रा. इंद्रायणी नगर, आंबेगाव, पुणे), अमोल तानाजी ढावरे (वय १९, रा. विश्व हाईटस, जांभुळवाडी रोड, आंबेगाव, पुणे) आणि आदित्य ऊर्फे सोन्या खंडु कांबळे (वय २०, रा. हनुमाननगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव, पुणे) या तिघांना पोलीसांनी अटक केली आहे. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी दारु दुकान मालकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ मे रोजी फिर्यादी हे दारुच्या दुकानामध्ये काम करीत असताना आरोपी अजय पांचाळ, तेजस वाडेकर, सोहेल आसंगी, गोविंद लोखंडे, सोन्या कांबळे, अमोल ढावरे यांनी दुकाना मध्ये घुसून फिर्यादी आणि मॅनेजरला शिवीगाळ केली. “मी अजय पांचाळ असुन, मी आताच जेल मधुन बाहेर सुटुन आलोय, तुला कळत नाही का हप्ता चालु करायला, हप्ता चालु केला नाही तर, तुला सोडणार नाही” अशी धमकी आरोपीने दुकान मालकाला दिली.

त्यानंतर दुकानातील दारुच्या बाटल्या, थंड पेयाच्या बाटल्या, काचेचे ग्लासवर दगड फेक केली. यामध्ये दुकानातील टी.व्ही.चे देखील नुकसान झाले. एवढेच नाही तर आरोपी अजय पांचाळने दुकानातील काऊंन्टरमध्ये १० हजार रूपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. या घटनेची माहिती मिळाताच भारती विद्यापीठ पोलीसांनी अवघ्या दोन तासात ३ जणांना अटक केली. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर कलम ३८५, ३९२, ५०४, ५०६, ४२७, क्रिमीनल अमेंन्टमेंन्ट अॅक्ट कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्त आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest