राजगुरुनगर: पार्किंगमधील सहा दुचाकी अज्ञातांनी पेटवल्या

राजगुरुनगर: येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमांनी हरिद्वार सोसायटी मधील पार्किंगमध्ये सहा दूचाकी पेटवून देऊन नुकसान केले. दुचाकी पेटवल्याच्या ठिकाणी  पेट्रोलसाठी वापरलेली प्लास्टिक बाटली, माचिस पडलेली आढळून आली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 11 Jul 2024
  • 02:15 pm
Rajgurunagar, Bikes Set on Fire, Khed Police Station

संग्रहित छायाचित्र

राजगुरुनगर: येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमांनी हरिद्वार सोसायटी मधील पार्किंगमध्ये सहा दूचाकी पेटवून देऊन नुकसान केले. दुचाकी पेटवल्याच्या ठिकाणी  पेट्रोलसाठी वापरलेली प्लास्टिक बाटली, माचिस पडलेली आढळून आली. तेथील एका दुचाकीचे पेट्रोल काढून अन्य गाड्या जाणीवपूर्वक पेटवून देण्यात आल्या.

सोसायटीतील रहिवाश्यांनी माहिती मिळाल्यावर पाण्याने आग विझवली. अज्ञात आरोपी विरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . विशेष म्हणजे यातील एक दुचाकी ही पोलिस कर्मचारी यांची आहे आहे. तर दोन दुचाक्या  पोलिस कर्मचाऱ्याच्या परिवारातील आहेत . 

आग आटोक्यात आली नसती तर शेजारील वाहनांनी  पेट घेतला असता व मोठी दुर्घटना झाली असती. मात्र दुर्घटना टळली आहे. पोलीस  प्रशासनाने दखल घेऊन लवकरात लवकर आरोपीचा शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest