संग्रहित छायाचित्र
पुण्यात एच. पी. सॅमसंग, कॅनन आणि डिस्ने कंपनीचे बनावट पार्ट तयार करणाऱ्या रॅकेटचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी २५ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखा १ च्या पथकाने केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार पेठ मधील आण्णासाहेब खैरेपथ येथे प्रविण खोड (वय-28 वर्ष, रा. कात्रज कोंढवा रोड, पुणे) यांचे दुकानात नामांकित कंपनीचे बनावट पार्ट तयार करण्यात येत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. बनावट पार्टची माहिती मिळताच पोलीसांनी प्रविण खोड यांच्या दुकानात छापा टाकला. यावेळी दुकानात सॅमसंग, कॅनन कंपनीचे बनावट टोनर, कार्टेज, आउटर बॉक्स, पॅक इंक बॉटल, होलोग्राम यांचे बनावटीकरण केलेले पार्ट व साहित्य मिळुन आले आहे.
गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दुकाना चालकाला ताब्यात घेतले. तसेच दुकानातील सर्व बनावट पार्ट जप्त केले आहे. या पार्टची किंमत एकूण २५ लाख २५ हजार रुपये आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधित तपास खडक पोलीस करत आहेत.
दरम्यान, आणखी एका घटनेत ६ जुलै रोजी आलेल्या तक्रार अर्जावरुन गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने रविवार पेठेथील तृप्ती ट्रेडर्स, प्रेम टॉईज, गणेश ट्रेडर्स, या दुकानांवर देखील छापा टाकला होते. या कारवाईत तिन्ही दुकानांतून बनावट डिस्ने कंपनीची खेळणी व शालेय साहित्य जप्त करण्यात आले आहे. या किंमत एकूण २ लाख ९४ हजार रुपये असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास फरासखाणा पोलीस करत आहेत.