पुणे: कामावरून काढल्याने तरुणाची आत्महत्या

पुणे: कामावरून काढून टाकल्याने तरुणाने बोपोडीतील नदीपात्रात २१ जून रोजी उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून खासगी कंपनीतील व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 23 Jul 2024
  • 03:57 pm
Bopodi, Youth Suicide, suicide

संग्रहित छायाचित्र

पुणे: कामावरून काढून टाकल्याने तरुणाने बोपोडीतील नदीपात्रात २१ जून रोजी उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून खासगी कंपनीतील व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल प्रमोद साळवी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. कंपनीचे व्यवस्थापक झीशान हैदर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साळवी यांची बहीण प्रीती अमित कांबळे हिने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विशाल येरवड्यातील कॉमर झोन परिसरातील एका खासगी कंपनीत कामाला होता. कंपनीतील व्यवस्थापक झीशान हैदर याने त्याला कामगारांसमोर अपमानित केले. कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली होती. विशाल यांना कामावरून कमी करण्यात आल्याने तो नैराश्यात होता. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest